satbara changed

सातबारा उताऱ्यात करण्यात आलेले 11 महत्त्वाचे बदल :-

  1. गावाचा कोड क्रमांक – आता गावाच्या नावासोबत त्याचा कोड क्रमांक (Local Government Directory) देखील दिसतो.
  2. जमिनीचे क्षेत्र स्पष्ट करणे – लागवडीयोग्य आणि पोटखराब क्षेत्र वेगवेगळ्या दाखवले जातात, आणि त्यांची एकूण बेरीज दिली जाते.
  3. नवीन क्षेत्र मापण्याची पद्धत – शेतीसाठी ‘हेक्टर आर चौरस मीटर’ आणि बिनशेतीसाठी ‘आर चौरस मीटर’ या एककांचा वापर केला जातो.
  4. खाते क्रमांकाची स्पष्टता – पूर्वी ‘इतर हक्क’ मध्ये असलेला खाते क्रमांक आता थेट खातेदाराच्या नावासमोर दिला जातो.
  5. मयत खातेदारांची नोंद – मृत व्यक्ती, कर्जबोजे आणि ई-कराराच्या नोंदी कंसात दाखवण्याऐवजी त्यावर आडवी रेषा मारली जाते.
  6. प्रलंबित फेरफारांची नोंद – अद्याप पूर्ण झालेल्या फेरफारांसाठी ‘प्रलंबित फेरफार’ असे स्वतंत्र रकान्यात दाखवले जाते.
  7. जुने फेरफार क्रमांक – सर्व जुन्या फेरफार क्रमांकांसाठी वेगळा रकान्यात दिला जातो.
  8. खातेदारांच्या नावांमध्ये ठळक रेषा – दोन खातेदारांच्या नावांमध्ये ठळक रेष असते, ज्यामुळे नावे स्पष्टपणे वाचता येतात.
  9. गट क्रमांक आणि शेवटचा व्यवहार – गट क्रमांकासोबत शेवटचा फेरफार क्रमांक आणि तारीख इतर हक्क रकान्यात शेवटी दाखवली जाते.
  10. बिनशेती जमिनीचे नवीन बदल – बिनशेती क्षेत्रासाठी ‘आर चौरस मीटर’ हे एकक कायम राहणार असून जुडी व विशेष आकारणी रकाने काढली जातात.
  11. अकृषिक जमिनीसाठी सूचना – बिनशेतीच्या सातबारा उताऱ्याच्या शेवटी “सदर क्षेत्र अकृषक क्षेत्रामध्ये रुपांतरित झाल्यामुळे गाव नमुना-12 लागू नाही” अशी सूचना दिली जाते.