Ladki Bahin Yojana 2100 Rs : लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दर महिन्याला पैसे दिले जातात. या योजनेत लवकरच महिलांना २१०० रुपये दिले जाण्याची शक्यता आहे.
या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार २१०० रुपये
विधानसभा निवडणुकांपूर्वी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली होती. या योजनेत सरकार महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत करते. या योजनेत फक्त निकषात बसणाऱ्या महिलांनाच पैसे दिले जातात. परंतु अनेक महिला नियमांत बसत नसतानाही त्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या अर्जांची तपासणी सुरु झाली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने अजून एक घोषणा केली होती. विधानसभा निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ असे आश्वासन त्यांनी दिले होते. दरम्यान, या २१०० रुपयांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. (Ladki Bahin Yojana)
या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार २१०० रुपये
लाडकी बहीण योजनेत जानेवारीपर्यंतचा हप्ता नागरिकांना मिळाला आहे. परंतु अजूनही महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे महिलांमध्ये नाराजी झाली आहे. दरम्यान, २१०० रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. आता अर्थसंकल्पात याबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. (Ladki Bahin Yojana Update)
या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार २१०० रुपये
राज्याचा अर्थसंकल्प १० मार्च रोजी होणार आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात मोठी घोषणा होऊ शकते. अर्थसंकल्पात २१०० रुपये देण्याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. जर अर्थसंकल्पात २१०० रुपये देण्याची घोषणा केली तर पुढच्या २-३ महिन्यात याची अंबलबजावणी होऊ शकते. त्यामुळे पुढच्या महिन्यापासून कदाचित महिलांना पैसे मिळू शकतात.
अर्जांच्या पडताळणीनंतरच पैसे
लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी झाल्यानंतरच महिलांना पैसे दिले जाणार आहेत. आतापर्यंत ९ लाख महिलांचे अर्ज हे बाद झाले आहेत. दरम्यान,५० लाख महिलांचे अर्ज बाद करण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिलांना आता लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.