Ladaki Bahin Yojna May Month Installment : लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या योजनेअंतर्गत मे महिन्याचे १५०० रुपये लवकरच महिलांच्या खात्यात जमा केले जातील.
मे महिन्याचे १५०० रुपये ‘या’ दिवशी महिलांच्या खात्यात येणार!
मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्यासाठी आदिवासी विभागाचा निधी वळवण्यात आला आहे आणि याच निधीमधून हा हप्ता दिला जाणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच महिलांना हे पैसे मिळण्याची शक्यता आहे.
मे महिन्याचा हप्ता लवकरच जमा होणार :-
लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विकास खात्याचे तब्बल ३३५ कोटी ७० लाख रुपयांचा निधी वळवण्यात आला असून, तो महिला व बालविकास खात्याकडे वर्ग करण्यात आल्याचे वृत्त आहे. यामुळे येत्या काही दिवसांत १५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा होतील अशी अपेक्षा आहे.
“हे पण वाचा” » लाडक्या बहिणींच्या खात्यात एकत्र 3000/- येणार? पहा कधी मिळणार मे महिन्याचा हप्ता…
जर महिलांना मे महिन्याच्या अखेरपर्यंत पैसे मिळाले नाहीत, तर कदाचित मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा होतील. परंतु, या आठवड्याच्या शेवटपर्यंत पैसे जमा होण्याची जास्त शक्यता वर्तवली जात आहे.
मे आणि जून चा हप्ता एकत्र मिळणार?
मे महिना संपायला अवघे काही दिवस उरले असल्याने, या आठवड्याच्या शेवटपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील अशी चर्चा आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मे महिन्याच्या 30-31 तारखेपर्यंत १५०० रुपये हप्ता जमा होण्याची शक्यता आहे.
“हे पण वाचा” » तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत नाव पहा
महिलांना पैसे कधी मिळतील याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे स्वतः माहिती देतील अशी अपेक्षा आहे. आदिती तटकरे अनेकदा ट्विट करून १५०० रुपये कधी येणार याबाबत माहिती देतात. अधिकृत माहिती आल्यावरच मे महिन्याचा हप्ता कधी येणार यावर विश्वास ठेवणे योग्य ठरेल.
मे महिन्याचे १५०० रुपये ‘या’ दिवशी महिलांच्या खात्यात येणार!