Cochin Shipyard Limited Recruitment 2025 : कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL) ने फायरमन, सेमी स्किल्ड रिगर आणि कुक या पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. या भरती मोहिमेद्वारे एकूण २५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी २० जून २०२५ या अंतिम मुदतीपूर्वी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
४थी, ७वी, १०वी पास असाल तर तुम्हीही मिळवू
शकता ७०,०००/- रुपये पगाराची नोकरी!
कोचीन शिपयार्डमधील भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २० जून २०२५ आहे. या भरती प्रक्रियेसाठी कमाल वयोमर्यादा ३० वर्षे निश्चित करण्यात आली आहे. उमेदवार CSL च्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना २००/- रुपये शुल्क भरावे लागेल. यामध्ये अग्निशामक पदासाठी १५ जागा, अर्धकुशल रिगर पदासाठी ०९ जागा आणि कुक पदासाठी ०१ जागा उपलब्ध आहे.
४थी, ७वी, १०वी पास असाल तर तुम्हीही मिळवू
शकता ७०,०००/- रुपये पगाराची नोकरी!
अग्निशामक पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी किमान १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर, अर्धकुशल रिगर या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान ४थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, कुक (स्वयंपाकी) पदासाठी अर्ज करणारा उमेदवार ७वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अग्निशामक, अर्धकुशल रिगर आणि कुक (स्वयंपाकी) या पदासाठी ₹ २१,३०० ते ₹ ६९,८४० अशी वेतनश्रेणी निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित पदासाठीची शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक तपासावी.
४थी, ७वी, १०वी पास असाल तर तुम्हीही मिळवू
शकता ७०,०००/- रुपये पगाराची नोकरी!
या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कोचीन शिपयार्ड लिमिटेड यांनी प्रसिद्ध केलेली भरतीची अधिकृत जाहिरात सविस्तर वाचावी. भरती विषयक अधिक माहितीसाठी कोचिंन शिपयार्ड लिमिटेड यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या