CET Exam Wrong Questions : एमबीए-सीईटी परीक्षा १ एप्रिल ते ३ एप्रिल या कालावधीत सहा सत्रांमध्ये आयोजित करण्यात आली होती. परीक्षेनंतर, विद्यार्थ्यांना त्यांच्या हरकती आणि शंका नोंदवण्यासाठी २८ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. या कालावधीत राज्यभरातून एकूण २५३ हरकती प्राप्त झाल्या, ज्यामध्ये १०१ प्रश्नांबाबत शंका उपस्थित करण्यात आली होती.
या चुकीच्या प्रश्नांसाठी विद्यार्थ्यांना मिळणार 28 अतिरिक्त गुण
प्राप्त झालेल्या तक्रारींमध्ये, लॉजिकल रिझनिंग विभागातील सर्वाधिक १३४ तक्रारी होत्या, तर अबस्ट्रॅक्ट रिझनिंगच्या २१, क्वांटीटेटिव्ह अॅप्टिट्यूडच्या ३५ आणि व्हर्बल अॅबिलिटीच्या ३५ तक्रारी होत्या. विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या या तक्रारींची सखोल पडताळणी केल्यानंतर, तीन वेगवेगळ्या सत्रांमध्ये एकूण २८ प्रश्न चुकीचे असल्याचे स्पष्ट झाले.
या चुकीच्या प्रश्नांसाठी विद्यार्थ्यांना मिळणार 28 अतिरिक्त गुण
यामुळे सीईटी सेलने (Maharashtra State Common Entrance Test Cell) जाहीर केले आहे की, संबंधित बॅचमधील सर्व विद्यार्थ्यांना या चुकीच्या प्रश्नांसाठी प्रत्येकी एक गुण दिला जाईल. याव्यतिरिक्त, सहा प्रश्नांच्या बाबतीत उत्तरपत्रिकाही अद्ययावत करण्यात आली आहे.
सीईटी सेलच्या या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता असून, याचा त्यांच्या पुढील प्रवेश प्रक्रियेवर थेट परिणाम होणार आहे.
या चुकीच्या प्रश्नांसाठी विद्यार्थ्यांना मिळणार 28 अतिरिक्त गुण