apply

Anganvadi bharti Apply
ठळक बावी…

• अंगणवाडी सेविका पदासाठी १२ वी उत्तीर्णची अट

• राज्यभरातील १० हजार पदे (अंगणवाडी सेविका व मदतनीस) भरली जाणार

• ५ फेब्रुवारी ते २० मार्चपर्यंत जाहिराती प्रसिद्ध करुन शैक्षणिक कागदपत्रांद्वारे होणार भरती

• ऑगस्ट २०२२ पूर्वी कार्यरत ज्या मदतनीस महिला बारावी उत्तीर्ण आहेत, त्यांना मिळेल सेविका म्हणून संधी

२० मार्चपूर्वी रिक्त पदे भरली जातील

मुख्यमंत्र्यांच्या १०० कलमी कार्यक्रमाअंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाने अंगणवाड्यांमधील सेविका व मदतनीस पदे भरतीस मान्यता दिली आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील रिक्त पदांची भरती २० मार्चपूर्वी केली जाणार आहे.

– प्रसाद मिरकले, महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर