नोंदणीसाठी कोणते पर्याय?

शेतकऱ्यांना dbt.mahapocra.gov.in या पोर्टलवर किंवा ई-पीक पाहणी अॅपवरून नोंदणी करता येते. ही प्रणाली वापरण्यासाठी कोणतेही शुल्क लागत नाही, आणि कोणत्याही अधिकाऱ्याची परवानगी आवश्यक नाही. मोबाईलवरून थेट फोटो अपलोड करून नोंदणी करता येते. यामुळे प्रक्रियेत पारदर्शकता येते आणि भ्रष्टाचाराला आळा बसतो.

नोंदणी कशी करायची?

  • ई-पीक पाहणी अॅप स्मार्टफोनवर डाउनलोड करा.
  • लॉगिननंतर शेतकऱ्याचे नाव व खातेक्रमांक निवडा.
  • शेतजमिनीचा प्रकार (कायम पड / चालू पड) निवडा.
  • “कूपनलिका पड” (विहीर) किंवा “बोअरवेल” यातील योग्य पर्याय निवडून त्या ठिकाणचा फोटो अपलोड करा.
  • माहितीची पडताळणी करून स्वयंघोषणा सबमिट करा.